Nilima mishra biography
Nilima mishra biography in telugu.
Nilima mishra biography wikipedia
अत्यंत प्रतिष्ठेचा रेमन मॅगसेसे अॅवॉर्ड यंदा नीलिमा मिश्रा आणि हरीश हांडे या दोन भारतीयांना जाहीर झाला. विशेष म्हणजे नीलिमा मूळच्या उत्तर प्रदेशातील असल्या तरी महाराष्ट्रात त्यांच्या सात पिढ्या वास्तव्यास आहेत. त्यामुळे साहजिकच तमाम महाराष्ट्राला अत्यंत गौरवास्पद अशी ही घटना आहे.
यांना ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या सामाजिक कार्यासाठी रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्कारापोटी मिळणारी रक्कम (२२ लाख रुपये) ग्रामीण भागाच्या विकासासाठीच खर्च केली जाणार असल्याचे त्यांचे वडील चंद्रशेखर मिश्रा यांनी जाहीर केले आहे.
सामाजिक कार्याचा ध्यास
सामाजिक कार्यासाठी यापूर्वीही नीलिमा यांना सहा छोटे-मोठे अॅवॉर्ड्स जाहीर झाले होते.
त्याचीही रक्कम त्यांनी भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतनच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठीच खर्च केली आहे.
Nilima mishra biography
चंद्रशेखर मिश्रा यांच्या चार अपत्यांपैकी नीलिमा ही तिसरी मुलगी. तिच्या दोन बहिणींचे लग्न झाले असून एक नाशिक येथे तर दुसरी पुण्यात स्थायिक झाली आहे. तिची आई निरुपमा या कानपूरच्या आहेत तर भाऊ शैलेंद्र पुणे येथील एका फार्मास्युटिकल